नाविन्यपूर्ण उपक्रम – बिनखर्चाचे ठिबकसिंचन 💦
वासोळे शाळा, मार्च २०१७
✍️ लेखिका – सविता संजय बारंगळे
आज आपण खूप जणांच्या तोंडून झाडांविषयी ऐकत असतो – “झाडे लावा, झाडे जगवा”. आपली गाडी लावायला एखादे झाड शोधत असतो. रखरखत्या उन्हात माणसांना थंडगार वाऱ्याची झुळूक हवी असते. सर्व गोष्टी निसर्गापासून हव्या असतात, आणि त्याचा अट्टाहासही केला जातो. पण माणसे आपली जबाबदारी विसरतात. अरे, झाडे लावली तर ती जगवली पाहिजेत ना!
याच गोष्टीचा विचार करून वासोळे शाळेत एक उपक्रम राबविला गेला. शाळेत बालपोषण आहारातील रिकाम्या तेलाच्या बाटल्यांचा खूप कचरा झाला होता. एवढ्या बाटल्यांचे काय करायचे? उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होते. शाळेत खूप झाडे होती. झाडे वाचली पाहिजेत, या सगळ्या गोष्टीचा विचार चालू होता.
श्री करंजे सरांनी यावर उपाय काढला. ५ ते ७ वीच्या मुलांना हाताशी घेऊन चारच्या सुट्टीत सर्व बाटल्या गोळा केल्या. बाटल्यांच्या तळाला छिद्रे पाडले. एक-एक बाटली धुरांड्याच्या बाजूला खड्डा करून त्यात पुरली. त्यात पाणी ओतून झाकण लावले. झाकण असल्यामुळे बाटलीमध्ये माती, खडे पडणार नाही; शिवाय पाण्याचे बाष्पीभवनही होणार नाही. त्यामुळे त्या झाडांना थेंब थेंब पाणी मिळत राहणार आहे.
बिनखर्चाचे ठिबकसिंचन 💦 आहे का नाही? 👉 ही टाकावू! बाटली खूप महत्त्वाची आहे. चला, तुम्हीही आता कामाला लागा.
झाडे लावा, झाडे जगवा 🌱🌿🌳
जि.प. प्राथमिक शाळा वासोळे
शब्दांकन – सौ. सविता बारंगळे 🙏