सुस्वागतम! शिक्षण आणि प्रेरणेच्या वाटचालीत आपले हार्दिक स्वागत•

सविता संजय बारंगळे – विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित शिक्षिका

मी ७ एप्रिल २००० पासून ग्रामीण भागातील विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये अध्यापन करत आहे. गेल्या अनेक वर्षांत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने काम करत आले आहे. सध्या जि.प. शाळा धनवडेवाडी येथे कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवत आहे.

शिकवण्याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि शिकण्याची आवड निर्माण करणे हा माझा मुख्य उद्देश आहे. खेळातून शिक्षण, सर्जनशील उपक्रम, डिजिटल साधनांचा वापर आणि पालक-शिक्षक सहकार्य यांच्या माध्यमातून शिक्षण अधिक आनंददायी व प्रभावी बनवण्याचा मी नेहमी प्रयत्न करते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळाव्यात, त्यांच्या कौशल्यांना वाव मिळावा आणि ते आत्मविश्वासाने पुढे जावेत यासाठी विविध शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यावर माझा विशेष भर असतो. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी आणि सकारात्मक शिक्षण वातावरण निर्माण करणे हीच माझी बांधिलकी आहे.

सुस्वागतम! शिक्षण आणि प्रेरणेच्या वाटचालीत आपले हार्दिक स्वागत•

सविता संजय बारंगळे – विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी समर्पित शिक्षिका

मी ७ एप्रिल २००० पासून ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये अध्यापन करत आहे. सध्या जि.प. शाळा धनवडेवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.
शिकवण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, आत्मविश्वास आणि शिकण्याची आवड निर्माण करणे हा माझा प्रयत्न असतो.

माझी कौशल्ये व यश

“ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रगतीसाठी मी सतत प्रयत्नशील आहे. खेळातून शिक्षण, डिजिटल साधनांचा वापर, पर्यावरण जनजागृती व पालक-शिक्षक सहकार्य हे माझ्या कार्याचे महत्त्वाचे आधार आहेत.”

⚽ खेळातून शिक्षण
💻 ई-लर्निंग व Zoom मार्गदर्शन
🌱 पर्यावरण व सामाजिक उपक्रम
👨‍👩‍👧‍👦 पालक-शिक्षक सहकार्य
2000 – 2004

जि.प. शाळा पेंबर (सुरुवातीचा टप्पा)

“वाचन संस्कृती व बालकथा उपक्रम सुरू करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला.”

2005 – 2008

जि.प. शाळा गोवे (सर्जनशीलतेची वाटचाल)

“‘कला-गोष्टी’ सुरू केल्या—गाणी, अभिनय, नाटिका व हस्तकला. लाजऱ्या मुलांना स्टेजवर आणून आत्मविश्वास वाढवला.”

2009 – 2012

जि.प. शाळा लिंब (खेळातून शिस्त)

“क्रीडा व टीमवर्कद्वारे शिस्त, वेळपालन व सहकार्य या मूल्यांचा अंगीकार विद्यार्थ्यांनी केला.”

सामाजिक व शैक्षणिक कार्य

२५ वर्षांच्या कालावधीत शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणपूरक असे विविध उपक्रम केले आहेत. खाली प्रत्येक उपक्रमासाठी फोटो व माहिती दिली आहे.

ई-बालभारती मार्गदर्शन

पुण्यातून महाराष्ट्रभर शाळांना मार्गदर्शन.

धान्य वाटप

कोरोना काळात धान्य व राशन वाटप.

शैक्षणिक साहित्य

विद्यार्थ्यांना वही, पेन, पुस्तके.

क्रीडा व कला उपक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध खेळ, सांस्कृतिक व कलात्मक कार्यक्रम राबवले.

पोषण आहार

विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार व पोषण जागरूकता उपक्रम राबवले.

पतंग विक्री

मुलांना स्वावलंबन, व्यवहारज्ञान व उद्योजकता शिकवण्यासाठी विद्यार्थी विक्री उपक्रम राबवला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी पतंग बनवून त्यांची विक्री केली.

राखी विक्री

धनवडे वाडी (दरे बुद्रुक) येथे विद्यार्थ्यांनी राखी बनवून त्यांची विक्री करण्यासाठी स्टॉल लावला.

धनवडेवाडी शाळा विकास

ग्रामीण भागातील शाळेच्या इमारतीत आवश्यक बदल करून मुलांसाठी अधिक चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण केले.

मोळेश्वर शाळा विकास

दुर्गम भागातील मोळेश्वर शाळेत संगणक मिळवून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

पालकांचे सहकार्य

पालकांच्या सहकार्याने मोळेश्वर शाळा, जावळी तालुका, जि. सातारा – शाळेच्या नूतनीकरणाची सुरुवात झाली.

नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतरचे दृश्य.

ग्रामीण भागातील दींडी

विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन पारंपरिक पद्धतीने दींडी काढत सांस्कृतिक जपणूक केली.

शैक्षणिक साहित्य निर्मिती

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून वही, पिशव्या आणि शैक्षणिक साहित्य तयार करून शिकण्यासोबतच स्वावलंबनाची प्रेरणा घेतली.

ऑनलाईन वर्ग

कोरोना काळात महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्गांचे आयोजन करण्यात आले.

कागदी पिशव्यांद्वारे जागृती

प्लास्टिकमुक्त उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी कागदी पिशव्यांचे वितरण करून जनजागृती केली.

पक्ष्यांना चारा-पाणी

उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी व दाणा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांत संवेदनशीलता निर्माण.

पालकांचा खेळांमधील सहभाग

विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही खेळांमध्ये सहभागी करून एक वेगळी परंपरा निर्माण केली.

मुलाखती सारखे उपक्रम

गवत कापणाऱ्या मजुरांच्या आणि स्थानिक व्यक्तींच्या मुलाखती घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण.

ऊस ताडी कामगार मुलांना शाळेत आणणे

ऊस तोडणी करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणाशी जोडण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न.

मुख्य वैशिष्ट्ये

शैक्षणिक सेवेतले आमचे ठळक टप्पे आणि कामगिरी

🏠

25+ वर्षांचा अनुभव

शिक्षण व मार्गदर्शन क्षेत्रात २५+ वर्षांचा ठोस अनुभव. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यक्तिगत विकास हा आमचा उद्देश.

🎓

10+ शाळांमध्ये कार्यरत

अनेक शाळांमध्ये शिक्षक व मार्गदर्शक म्हणून कार्यरत राहून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील.

📚

विविध शैक्षणिक उपक्रम

विज्ञान मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा यांसारखे उपक्रम नियमितपणे आयोजित.

🏆

विद्यार्थ्यांची यशोगाथा

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून यश मिळवले.

🤝

पालक व शिक्षक सहकार्य

विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पालक व शिक्षक यांच्यातील सहकार्य हाच मुख्य आधार आहे.

🎯

करिअर मार्गदर्शन

करिअर निवड, वैयक्तिक विकास आणि शैक्षणिक मार्गदर्शनासाठी सतत सहाय्य उपलब्ध.

वृत्तपत्रांतील क्षणचित्रे

शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव

News 1 News 1 News 1 News 1

शैक्षणिक साधने

शिकण्यासाठी उपयुक्त लेख, सूत्रे, खेळ आणि ऑनलाईन टेस्ट

माझे लेख

विविध विषयांवरील लेख आणि माहितीपूर्ण लिखाण.

Open

सूत्रे आणि गणिते

गणिती सूत्रे व उदाहरणे सोप्या भाषेत.

Open

मराठी Online Test

मराठी शिकण्यासाठी आणि सरावासाठी उपयुक्त Online Test.

Open

Puzzle

बौद्धिक विकासासाठी सोप्या व मजेदार पझल्स.

Open
अधिक पहा
Scroll to Top